सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेत ‘फिरोदिया शिवाजीयन्स’चा डंका; अंतिम सामन्यात ‘सुमन एफसी’ला धूळ चारली
अहिल्यानगरमध्ये गणेश मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल संघाने सुमन एफसी संघावर विजय मिळवला.
Firodia Shivajeans : अहिल्यानगरमध्ये गणेश मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल संघाने सुमन एफसी संघावर (Firodia Shivajeans) विजय मिळवत बाजी मारलीयं. फिरोदिया शिवाजीयन्स संघाने सुमन एफसी संघाचा 3-0 ने पराभव करुन विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे फिरोदिया शिवाजीयन्स संघाने स्पर्धेतील पाचही सामन्यात एकही गोल न स्विकारता विजेतेपद पटकावले आहे.
अहिल्यानगरमध्ये ‘अॅट्रॉसिटी’च्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
लीग कम नॉकआऊट पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स एफसीने साखळी फेरीतील तीन्ही सामने जिंकून आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. उपांत्य फेरीत सॉकर क्लबचा 4-० असा दणदणीत पराभव करत संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सुमन एफसीवर 3-० असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
फिरोदिया शिवाजीयन्स संघातील मयूर गोरखा, दर्शन पवार आणि सूरज शर्मा यांनी कमालीची कामगिरीत करीत प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयाची महत्वाची भूमिका बजावली. संघातील इतर खेळाडूंनीही चित्तथरारक प्रदर्शन करीत अंतिम सामना जिंकण्यात मोलाची कामगिरी केलीयं. संघाच्या या यशाबद्दल फिरोदिया शिवाजीयन्सचे खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्सने विजेतेपद पटकावल्यानंतर सरपंच विजय खोमणे आणि फरताळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी सुशील लोट, राकेश घावरी, सचिन वाल्मिकी आणि सनी वाघेला यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि मेहनतीमुळे स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.