आधी तुमचा तमाशा आटोक्यात आणा, भुजबळांनी राधाकृष्ण विखेंना फटकारले !
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर आज जोरदार टीका केली. आघाडीचा कारभार म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी केलेल्या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी ? जयंत पाटलांचे थेट उत्तर
भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री विखे यांच्यावर सडकून टीका केली. भुजबळ म्हणाले, आमच्याकडे कीर्तन आहे की तमाशा हे पाहण्याऐवजी शिंदे गट 22 जागा मागतोय तो तुमचा तमाशा आहे तो जरा आटोक्यात ठेवा. तुमचे दोन पक्ष असताना मतभेद होतात तर इकडे तीन पक्ष आहेत मतभेद होणारच.
मतभेद कुठे होत नाहीत एकच पक्ष असेल तरीही तेथे मतभेद होतात. की मलाच तिकीट मिळालं पाहिजे. याच गटाला तिकीट मिळालं पाहिजे. इथे तर तीन पक्ष आहेत मतभेद होणारच. पण, जोपर्यंत तिन्ही पक्षांचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सोमोरे जाईल, असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
CM शिंदेनी सांगितली समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याची डेडलाईन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना लोकसभा निवडणुका लढण्यासाठी तयारी करा अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्याबाबत पत्रकारांनी भुजबळ यांना विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले त्या बैठकीत मी सुद्धा उपस्थित होतो. तेथे अशा कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. याबाबत मला आणखी काही माहिती नाही.
समृध्दी महामार्गाला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. विकास होत आहे त्यामुळे विरोध करण्याचे काही कारण नाही. भिवंडी बायपास परिसरात मोठी गर्दी असते. आता समृध्दी महामार्ग होत आहे त्याचा आनंदच आहे असे भुजबळ म्हणाले.