महाविकास आघाडीत बिघाडी? जयंत पाटलांचे थेट उत्तर

  • Written By: Published:
महाविकास आघाडीत बिघाडी? जयंत पाटलांचे थेट उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आले आहे. हा मेळावा 10 जूनला होणार आहे. या मेळाव्याच्या तयारी नियोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठीच्या जागेची पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्यांना भाजपमध्ये मान दिला जात आहे. त्यांना पहिल्या रांगेत संधी मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नेत्यांमध्ये उघड नाराजी दिसून येत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत भाजप आमदार राम शिंदे यांना बसण्यासाठी खुर्ची नव्हती, त्यावरून जयंत पाटील यांनी हा टोला लगावला आहे.

‘आषाढी वारी’निमित्त वारकऱ्यांना मिळणार टोलमुक्ती? बावनकुळेंचे गडकरींना पत्र

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत होत असलेल्या वादावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद होणे, बिघाडी होणे याचा प्रश्नच येत नाही. ईडीच्या कारवाईबाबत ते म्हणाले, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करत आहे. मी काही चुकीचे काहीही केलेली नाही. त्यामुळे माझ्यावर आक्षेप घेण्याचा मुद्द्याच नाही.

CM शिंदेनी सांगितली समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याची डेडलाईन

महाविकास आघाडीत काही झाले तर त्याला भाजप जबाबदार असल्याचे म्हणणे म्हणजे दुसऱ्याच्या घरात पोर झाला तर भाजपमुळेच झाले असे म्हणू नका, असा टोलाही फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्य नेत्यांना लगावला आहे. या प्रश्नावर जयंत पाटील हे केवळ हसले. माझ्या मनात उत्तर आहे पण मी ते उत्तर देणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube