Heramb Kulkarni यांना मारण्यासाठी 15 हजारांची सुपारी; पोलीस तपासात नेमकं काय आढळलं?

Heramb Kulkarni यांना मारण्यासाठी 15 हजारांची सुपारी; पोलीस तपासात नेमकं काय आढळलं?

Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांच्यावर चार दिवसांपूर्वी नगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला. सुपारी देऊन हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात (Police investigation) समोर आले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV footage)आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. आणखी दोन हल्लेखोर फरार आहेत.

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; लग्न अन् सामाजिक कार्यक्रम ठरले विघ्न

चार दिवसांपूर्वी अहमदनगर (Ahmednagar)शहरातील रासनेनगर परिसरातील काही तरुणांनी हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांची गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यामध्ये एका पानटपरी चालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस चौकशीत समजले आहे.

ललित पाटीलला महिला पुरवल्या जायच्या, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ…; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने सुरुवातीला चैतन्य सुनील मडके (रा.सुडके मळा) याला ताब्यात घेतले. त्याने सांगितलेल्या माहितीवरुन अक्षय विष्णू सब्बन आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तसेच त्यांचे आणखी दोन साथीदार फरार आहेत.

आरोपी अक्षय सब्बन यांची सीताराम सारडा विद्यालयाजवळ (Sitaram Sarda Vidyalaya)पानटपरी होती. या पानटपरीच्या विरोधात सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेने ही पानटपरी त्या जागेवरुन हटवली. त्याचा राग मनात धरुन संशयित अक्षय सब्बन याने त्याच्या पाच साथीदारांनी मिळून कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला.

पोलिसांना सुरुवातीपासून सब्बनवर संशय होताच. पोलिसांनी सब्बनला अटक केली, मात्र तो कसलीही माहिती देत नव्हता. मात्र सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीसारखा एक मुलगा कोंड्यामामा चौकात राहात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी चैतन्य सुनील सुडकेला उसाच्या फडातून ताब्यात घेतले.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे अवघ्या 15 हजार रुपयांची सुपारी घेऊन त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे एखाद्याच्या आयुष्याची किंमत फक्त 15 हजार रुपये आहे का? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आपल्यावर हल्ला करणारे पाचजण होते, म्हणजे त्यांना ते पैसे वाटून घ्यायचे झाले तर प्रत्येकाच्या वाट्याला फक्त तीन हजार रुपये येणार होते. फक्त तीन हजार रुपयांसाठी आजची तरुण पिढी एखाद्याच्या जीवावर उठत आहे, तर ही गोष्ट नक्कीच समाजाला विचार करायला लावणारी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube