परमपूज्य पं. प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचा ग्लोबल स्पिरिच्युअल लिडरशिप अवॉर्डने सन्मान
पंडित प्रदीपजी मिश्रा यांना ग्लोबल स्पिरिच्युअल लिडरशिप अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. यावेळी चेअरमन डॉ सुजय विखे पाटील उपस्थित होते.

पिंपरी निर्मळ येथे जनसेवा फाउंडेशन आयोजित शिव महापुराण (Mishra) कथे दरम्यान विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा जे त्यांच्या शिव महापुराण कथांसाठी ओळखले जातात यांना ग्लोबल स्पिरिच्युअल लिडरशिप अवॉर्ड
ने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पा. व विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष १८३ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ दीपक हरके यांच्या हस्ते पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांना ग्लोबल स्पिरिच्युअल लिडरशिप अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील उपस्थित होते.
Mla Shivajrao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
काही दिवसांपूर्वी भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्या हस्ते “चॅम्पियन्स ऑफ चेंज मध्य प्रदेश” आवृत्तीचे पुरस्कार वितरण करण्यात आलं. त्यांनी अध्यात्म, समाजकल्याण, कला, आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील १६ उत्कृष्ट प्रतिभांचा सन्मान केला. प्रसिद्ध आध्यात्मिक कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा सन्मान करण्यात येथे करण्यात आला होता.
सत्कार समारंभात राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी अध्यात्म क्षेत्रातील पंडित प्रदीप मिश्रा, समाजकल्याण क्षेत्रातील पंडित ओमप्रकाश मेहता, आमदार कृष्णा गौर, हेमंत तिवारी, उमाशंकर सिंह, विनोद कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस महासंचालक अन्वेश मंगलम, रोहित जैन, मनोज साहू, अभिषेक कुमार पांडे, पद्मश्री डॉ. मुनीश्वर चंद्र दावर, आरोग्य क्षेत्रातील डॉ. अजय राणा, सौम्या टंडन, कला क्षेत्रातील अनिल सिंग चंदेल, शिक्षण क्षेत्रातील जयनारायण चौकसे आणि क्रीडा क्षेत्रातील भावना टोकेकर यांचा सन्मान केला.