जळगावमध्ये बॅंकेवर सिनेस्टाईल दरोडा, 17 लाखांची रोकड अन् सोनं लुटलं

जळगावमध्ये बॅंकेवर सिनेस्टाईल दरोडा, 17 लाखांची रोकड अन् सोनं लुटलं

In Jalgaon two men robbed the State Bank, Thieves escaped with Rs 17 lakh and gold : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लुटमार-दरोडा पडल्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली. मेडशी येथील बॅंकेवर दरोडा पडल्याची घटना ताजी असतांनाच आता जळगावमध्येही भरदिवसा सिनेस्टाईल दरोडा (Robbery) पडल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान स्टेट बँकेत दरोडा (State Bank Robbery) टाकून लाखोंची रक्कम पळवल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील स्टेट बॅंकेत चोरट्यांनी चाकूच्या धाकारवर सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून 17 लाखांची रोकड व सोन्याचा ऐवज लंपास केला. कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या शाखेत हे थरारनाट्य झाले. चोरट्यांनी सकाळी बँक फोडली. त्यांनी बँक व्यवस्थापक राहुल महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने वार करून बॅंकेतील रक्कम लुटली.

जळगाव येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडली. अधिकारी, कर्मचारी बँकेत पोहोचले. ग्राहकांचीही गर्दी होती. बँक उघडल्यानंतर अर्ध्या तासात ही दरोड्याची थरारघटना घडली. घड्याळात बरोबर साडेनऊ वाजले. नेमक्या त्याच वेळी स्टेट बँकेच्या या शाखेत दरोडा पडला. दुचाकीस्वार दोन तरुणांनी शस्त्रे दाखवून कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यांना एका खोलीत बंद केले. शाखा व्यवस्थापक राहुल महाजन यांच्याकडे तिजोरीची चावी मागितली. त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या मांडीत कोयत्याने वार केले. यामुळे सर्व ग्राहक आणि कर्मचारी घाबरले.

ठाकरेंचा परदेश दौरा अन् पवार पोहोचले शिंदेच्या घरी; काय झाली चर्चा, वाचा सविस्तर

महाजन यांच्याकडून चावी घेतल्यानंतर दरोडेखोर तिजोरीकडे वळाले. सुमारे 17 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. यावेळी त्यांनी बँकेत ठेवलेले सोनेही लुटले. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या धाडसी चोरीची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात दरोडेखोराविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. सध्या जखमी शाखा व्यवस्थापक राहुल महाजन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube