नाट्य परिषद करंडक एकांकिका स्पर्धेचे नगरमध्ये उद्घाटन; 12 एकांकिकांचे होणार सादरीकरण

Ahilyanagar News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई आयोजित “नाट्य परिषद करंडक” या भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अहिल्यानगर केंद्रावरील (Ahilyanagar News) प्राथमिक फेरीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी शाखाध्यक्ष अमोल खोले आणि प्रसाद बेडेकर, सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे, अनंत जोशी, प्रसाद भणगे व परीक्षक प्रमोद लिमये आणि विनोद राठोड आदी उपस्थित होते .
महाराष्ट्रातील हौशी, प्रायोगिक कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा, नवोदित कलाकारांमधे नाट्यकलेची ओढ निर्माण व्हावी तसेच राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील सर्व केंद्रांवर एकूण 252 संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे.
अहिल्यानगर केंद्रावरून या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले असून छत्रपती संभाजीनगर येथील तीन तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी येथील प्रत्येकी एका संघाचा या स्पर्धेत समावेश आहे. “नाट्य परिषद करंडक” स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रसाभिनय, अहिल्यानगर,(एकांकिका – देखावा),नाटकंती, अहिल्यानगर,(Tackk) होप फौंडेशन अहिल्यानगर (सेकंड चान्स,आपलं घर, अहिल्यानगर (कोंधट), रंगविहार, अहिल्यानगर (झिम पोरी झिम…)
अहिल्यानगर महाकरंडकचा मानकरी ठरला पुण्यातील ‘सखा’, ब्रह्यपुरा, गुड बाय किस एकांकिका द्वितीय
नटेश्वर कला व क्रीडा मंडळ, राहुरी (गुण्या गोवींदाणे) नाट्य मंडळी, छत्रपती संभाजीनगर (परतलेले घरकुल), लोकसाहित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर (सावळा), नाट्यदर्शन, छत्रपती संभाजीनगर (बुजगावणं), एस.एस.टी. आयुर्वेद महाविद्यालय, संगमनेर (Dissection), संकल्पना फौंडेशन, कोपरगांव (ये साली जिंदगी), वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर (नथिंग टू से) या 12 एकांकिका आज स्पर्धेमध्ये सादर होणार आहेत.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दि. 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल खोले यांनी केले. स्पर्धेविषयी माहिती जालिंदर शिंदे यांनी दिली तर आभार प्रदर्शन आणि प्रसाद बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी केले.
तब्बल 53 वर्षांची नाट्यसेवा! दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते’ पुरस्कार