अहमदनगरमध्ये 10 बांग्लादेशींची घुसखोरी! एटीएसच्या पथकाने चौघांना घेतलं ताब्यात

अहमदनगरमध्ये 10 बांग्लादेशींची घुसखोरी! एटीएसच्या पथकाने चौघांना घेतलं ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे.

रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार

या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, शहाबुद्दीन जहागिर खान, दिलावर खान सीराज ऊल्लह खान, शहापरान जहागिर खान या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सहा जण फरार झाले आहे.

राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

बुधवारी रात्री उशिरा 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते आहे.

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! भल्या पहाटेच चंद्रावर मारली चक्कर; पहिला फोटो आला समोर

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड,शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कोथरुडमध्ये नाकाबंदीदरम्यान एटीएसकडून दोन दहशतवाद्यांना अटक करण्या आली होती. या दहशतवाद्यांचं कनेक्शन परदेशातल्या दहशतवादी संघटनांशी असल्याचं समोर आलं होतं. त्यांनतर या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता.

अहमदनगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या बांग्लादेशी घुसखोरांचं दहशतवादी संघटनांशी कनेक्शन आहे का? त्यांनी घुसखोरी का केली? यासंदर्भात एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube