‘कर्डिलेसाहेब’ आता हिशेब पूर्ण; अध्यक्षपदावर बसताच खासदार विखेंचा मिश्किल टोला

‘कर्डिलेसाहेब’ आता हिशेब पूर्ण; अध्यक्षपदावर बसताच खासदार विखेंचा मिश्किल टोला

अहमदनगर : संपर्क करणं आणि विकास करणं याच्यामध्ये फरक असतो. कोणीतरी महापुरुषांनी म्हटलंय की, माणसाची ओळख त्याच्या कार्यानं होत असते. माणूस जरी नसला तरी त्याच्या कर्माच्या माध्यमातून बदल होत असतो. हा नगर शहरातील उड्डाणपूल (Flyover), बायपास (Bypass), अहमदनगर करमाळा रस्ता(Ahmednagar Karmala Road), ही साकळाई योजना (Saklai Schemes) हे आम्ही केलेली कर्म आहेत. ज्याचं फळ आम्ही या गोरगरिबांना देण्याचं काम करत आहोत. आजचे सत्कारमूर्ती अहमदनगर जिल्हा बॅंकेचे (Ahmednagar District Cooperative Bank)अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile)देखील आहेत. बऱ्याच मेहनतीनं मला त्यांना खुर्चीवर बसवता आलं आहे, त्याचवेळी कर्डिले साहेब आता आपला हिशेब पूर्ण असा मिश्कील टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी लगावला.

श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी येथे करण्यात आलं. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलत होते.

खासदार विखेंनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा; मविआ सरकारनं ‘साकळाई’ला डावललं

अनेक लोकं, माध्यमांमध्ये असं म्हणत होते की, 2019 मध्ये विखेंनी कर्डिलेंना पाडलं. विखेंनी कर्डिलेंचा असा माज मोडला. विखेंनी असं केलं. तुम्हाला कल्पना नसेल, प्रामाणिकतेनं काम केल्यानंतरही आरोप सहन करण्याची क्षमता आमच्या कुटुंबाला बऱ्याच वर्षांपासून आहे. असं म्हणत कॉंग्रेसलाही टोला मारला.

अडीच तीन वर्ष आम्ही त्या गोष्टीची वाट पाहिली. शिवाजी कर्डिले या गोष्टीला दूजोरा देतील की मी त्यांना कायम म्हणायचो की मला एकदा संधी येऊ द्या मी सिद्ध करुन दाखवील की, आम्ही तुमच्यासाठी काय करु शकतो. त्यामुळं आता तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या की, आपलं सगळं मिटलंय, आता सगळ्यांनी एका दोरीत राहायचं, असंही यावेळी खासदार विखे पाटील म्हणाले.

आम्ही एक आहोत, एक होतोच. पण प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक सल असतेच की, प्रत्येक नेत्याचं पूनर्वसन व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. आणि मग आज या जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचं पूनर्वसन केल्याचंही यावेळी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube