नगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! हुल्लडबाजांचा गोंधळ अन् दगडफेक

नगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! हुल्लडबाजांचा गोंधळ अन् दगडफेक

Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे. शहरातील नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहो होते. या कार्यक्रमास गर्दीही जमली होती. मात्र, त्याचवेळेस काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला.

Gautami Patil : पाटील हेच आडनाव लावणार, मराठा संघटनेला गौतमीचं सडेतोड उत्तर

शहरातील नागापूर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला युवकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळात जमलेल्या काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नंतर गोंधळ इतका वाढला की त्यांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याचे समजते. या गोंधळामुळे कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी जर व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिली. येथून पुढे जर असे प्रकार घडले तर कार्यक्रम करणार नाही, अशी भूमिका पाटीलने जाहीर केली.

दरम्यान, गौतमी पाटील ही याआधीही अनेक वादात अडकली आहे. मध्यंतरी तिच्या आडनावाचाही वाद चांगलाच गाजला होता. टीका टिप्पणी झाली होती. राजकीय वर्तुळातही हा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला होता.  गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचे प्रसंग अनेकदा घडत असतात. याआधीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. आताही नगर शहरात घडलेल्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube