शिर्डीचं गणित बदललं! उत्कर्षा रुपवते वंचितमध्ये; तिकीट मिळाल्यास ठाकरेंची कोंडी
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक (Shirdi Lok Sabha Election) असलेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. येथे अद्याप वंचितने उमेदवार दिलेला नाही. जर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना तिकीट दिलं तर ठाकरे गटाची मोठी कोंडी होणार आहे. रुपवते यांच्या उमेदवारीने एकूणच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाटचाल कठीण होणार आहे. दरम्यान, उत्कर्षा रुपवते यांनी काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचित आघाडीत प्रवेश केला. अद्याप आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही.
बुधवारी रुपवतेंनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठविला होता. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यातच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेसच्या रुपवते या लोकसभा लढवण्याच्या तयारीत होत्या. याबाबत त्यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे मागणी देखील केली होती.
Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर
मात्र महाविकास आघाडीकडून शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने रुपवते नाराज होत्या. बुधवारी त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला. मागील 16 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला पक्ष का सोडावा लागतो याबाबत विचार केला जावा असं देखील यावेळी त्यांनी या पत्रामध्ये म्हटले होते.
रुपवते वंचितकडून लोकसभा लढणार?
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या रुपवते उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराज होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईमध्ये भेट घेतली होती. दरम्यान आज गुरुवारी त्यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेत वंचित आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून रूपवते या लोकसभेच्या आखाड्यात उतरणार अशी चर्चा देखील रंगली जात आहे.
Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत