बारामतीचं मिटलं आता दिंडोरीत बंडखोरीचे धक्के; भाजप नेत्याच्या ‘पॉलिटिक्स’ने वाढली डोकेदुखी

बारामतीचं मिटलं आता दिंडोरीत बंडखोरीचे धक्के; भाजप नेत्याच्या ‘पॉलिटिक्स’ने वाढली डोकेदुखी

Maharashtra Politics : राज्यातील महायुतीत अनेक ठिकाणी धुसफूस आहे तर काही ठिकाणी बंडखोरी (Maharashtra Politics) उफाळून आली. ही बंडखोरी शमविताना नेतेमंडळींना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) माजी आमदार विजय शिवतारे यांना माघार घ्यायला लावण्यात यश आल्यानंतर आणखी एका मतदारसंघात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. दिंडोरी मतदारसंघातील (Dindori Lok Sabha) राजकीय घडामोडी महायुतीला त्रासदायक ठरू लागल्या आहेत. या मतदासंघात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

एक कॉल, खासदार पडण्याचा धोका अन् बापूंनी निर्णयच फिरवला; शिवतारेंनी सांगितलं माघारीचं कारण

महायुतीने या मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना (Bharati Pawar) उमेदवारी दिली आहे. यानंतर महायुतीतील घटकपक्षांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित होते. परंतु,भाजपमधीलच असंतुष्टांनी विरोधाचा आवाज उठवला आहे. माजी खासदार चव्हाण अपक्ष लढण्यावर अजून तरी ठाम आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. भारती पवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यात या संभाव्य बंडखोरीने नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. बंडखोरी कायम राहिली तर याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल.

या परिस्थितीची जाणीव असल्याने महायुतीकडून आधीच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आता चव्हाण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना तिकीट दिले आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त तिसरा पर्याय नसल्याने चव्हाण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय  घेतला आहे.

हरिश्चंद्र चव्हाण हे माजी खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना डावलून भारती पवार यांना संधी देण्यात आली होती. पवार सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. आता त्यांच्यासमोर महाविकास आघाडीबरोबर चव्हाण यांचेही आव्हान निर्माण झाले आहे. चव्हाण यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

 विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणार, बारामतीसारखाच.. उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांची प्रतिकिया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube