महिनाभर आधीच दंगलींचे अंदाज, विरोधकांच्या लॉजिकवर केसरकरांचा संताप

महिनाभर आधीच दंगलींचे अंदाज, विरोधकांच्या लॉजिकवर केसरकरांचा संताप

Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले.

राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा कुठे अशी दंगल उसळली नाही. मात्र, भाजप शिंदे गटाच्या सरकारच्या काळात अशी स्थिती सातत्याने निर्माण होत असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांनी केला आहे. या टीकेलाच केसरकर यांनी उत्तर दिले आहे.

Devendrs Fadanvis : निर्णय कर्नाटकात, वाद महाराष्ट्रात; फडणवीसांनी टाकली ‘मविआ’ त काडी

केसरकर आज नगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. केसरकर म्हणाले, दंगली करणारेच सत्तेत बसले की दंगली होणारच नाहीत. त्यांनी (महाविकास आघाडी) दंगली केल्या असं मी म्हणणार नाही. परंतु, कोल्हापुरात दंगल झाली. मी स्वतः कोल्हापुरचा पालकमंत्री आहे. या दंगलीत कोल्हापूर शहरातला एकही माणूस दगड मारायला नव्हता. ही सगळी माणसं बाहेरून आली होती. या लोकांना कोल्हापुरात कुणी पाठवलं, असा सवाल त्यांनी केला.

राज्यात दंगली होतील असे अंदाज दोन महिने आधीच तुमच्या लोकांनी व्यक्त केले होते. हे लोक आधीच दंगलींचे अंदाज कसे काय व्यक्त करतात, असाही प्रश्न त्यांनी केला. सामाजिक ऐक्य टिकवणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही लोकांना भडकावणार आणि आम्ही दंगली केल्या म्हणून आमच्यावर आरोप करणार हे आजिबात चालणार नाही, असे केसरकर यांनी ठणकावून सांगितले.

Nitesh Rane on Sanjay Raut : …म्हणून मी पातळी सोडून बोलतो; राणेंनी सांगितली राऊतांविरोधातील युद्धनीती

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube