अतिक्रमणांवर हातोडा ! पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यास सुरुवात
Ahmednagar News : शहरातील कापडबाजारात किरकोळ कारणावरून व्यापाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली होती. यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी एकत्र येत शनिवारी व्यवहार बंद ठेवले. ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाही काढला. येथील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनानेही कठोर भूमिका घेत या भागातील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम सुरू केली आहे.
पोलीस प्रशासनाने व आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक रविवारी सकाळीच कापड बाजारात दाखल झाले आहे.
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : शिवाजी कर्डिलेंच्या मैदानात कुस्ती लंके-विखेंची
या पथकाला संरक्षण देण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही आहे. कापड बाजार परिसरात फेरीवाले व व्यापारी यांच्यात वाद आहेत. फेरीवाल्यांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीही अतिक्रमणे काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, ठोस तोडगा निघाला नाही. आता तर थेट व्यापाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडू लागल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने आता येथील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही आहे. ही अतिक्रमणे हटाव मोहिम अशीच सुरू राहणार असल्याचे महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदनगरमधील व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
काल कापड बाजारात जमलेल्या व्यापाऱ्यांनी पोलिसांना याबाबत सांगितले होते. किरकोळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांत वाद होऊन जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेनंतर कापड बाजारातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई होत आहे. महापालिकेच्या पथकाबरोबर जवळपास वीस कर्मचारी आहेत. या भागातील सगळीच अतिक्रमणे काढण्यावर पथकाचा भर राहणार आहे. ज्यामुळे भविष्यात पुन्हा असे वाद उद्भवणार नाहीत.