राऊत गरजले ! आम्ही गुलाबो गँगच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार..
Sanjay Raut vs Gulabrao Patil : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज सभेआधी राऊत यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि अन्य फुटीर नेत्यांच्या समूहाला गुलाबो गँग असे संबोधत त्यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
आज राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार असल्याचाही इशारा दिला. ते म्हणाले, ‘ही सभा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची आहे. त्यातला मी एक लहानसा घटक आहे. धमक्या कुणाला देताय तुम्ही, त्यांचे (गुलाबराव पाटील) जे आकांडतांव सुरू आहे. या जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. त्यांनी पन्नास पन्नास शंभर कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली ते चार ते पाच प्रमुख माणसे आहेत येथे.’
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र; अखेर गुन्हा दाखल
‘ते शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या मेहेरबानीने जिंकून आले. आणि नंतर विकले गेले. अशी ही गुलाबो गँग. या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत. ते धमक्या देत आहेत देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्यातील काही दगड आमच्याकडे सोने म्हणून होते पण शेवटी ते दगडच निघाले. त्याला काय करणार ?, त्यांच्या मनात भीती आहे आम्ही आजच्या सभेत त्यांचा भांडाफोड करू.’
‘माझ्या हातातील कागद जळगावच्या पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून त्यांनी जी चढ्या भावाने खरेदी केली. त्यात वैद्यकिय उपकरणे आहेत. दोन लाखांचे व्हेंटीलेटर पंधरा लाखांना खरेदी केले. त्यांच्याच गँगच्या एका आमदाराने प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सगळे प्रकरण आता बाहेर काढू’, असा इशारा राऊत यांनी दिला.
भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
फडणवीस चौकशी करा
‘राज्य सरकारचे मंत्री दादा भुसे, राहुल कुल यांचे भ्रष्टाचाराचे कागद सीबीआयकडे दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी चौकशी करून दाखवावी. किरीट सोमय्या यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी यावर बोलावं. लोकांचे प्राण जात असतावा गुलाबो गँग मात्र भ्रष्टाचार करत होती’, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला.