Lok Sabha 2024 : ‘पळू नका, माझ्याविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवा’; नाथाभाऊंचं महाजनांना चॅलेंज

Lok Sabha 2024 : ‘पळू नका, माझ्याविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवा’; नाथाभाऊंचं महाजनांना चॅलेंज

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना आव्हान दिले आहे.

Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube