Maratha Reservation Protest : जालन्यातील लाठीचार्जनंतर एस टी महामंडळ सतर्क; एसटीच्या फेऱ्या बंद
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता अहमदनगरमध्ये एस टी महामंडळाने देखील या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आज एसटीच्या सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद करा, राजीनामा द्या’; संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचा संताप !
लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद!
जालना येथे मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation Protest) झालेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला होता. त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आज एसटीच्या सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.
Ahmednagar News : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी काल (शुक्रवारी) काढण्यात आलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राज्यातील 11 एसटी बस पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने एसटी महामंडळाला सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यामधील अकोले, कोपरगाव येथील लोकल एसटी बसच्या फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत, असे मनीषा सपकाळ यांनी सांगितले.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण…
आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.