मंत्री भागवत कराडांनी सांगितली अहमदनगरच्या नामांतरातील अडचण

मंत्री भागवत कराडांनी सांगितली अहमदनगरच्या नामांतरातील अडचण

अहमदनगर : आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha), विधानसभा (Vidhansabha Elections) निवडणुकीसाठी भाजपने (BJP)जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत भाजप विरोधकांचा दारुण पराभव करून लोकसभेच्या 48 पैकी 48 तर विधानसभेच्या 200 जिंकेल, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad)यांनी केला आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena)आणि आरपीआय (RPI)हे तीन घटक पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणूक लढवणारे आहेत. त्याचवेळी शिंदे गटाला किती जागा सोडायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे यावेळी भागवत कराड यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण एकदिलाने प्रयत्न 48 च्या 48 जागा जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मंत्री कराड यांनी सांगितले.ते आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्राामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी अहमदनरच्या नामांतरणासाठी अहमदनगर महानगपालिकेमधून ठराव पास करुन राज्य सरकारकडे द्यावा लागेल आणि राज्य सरकारला केंद्राकडे मागणी करावी लागेल, असेही यावेळी कराड यांनी सांगितले.

पुण्यात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, नेमकं काय आहे प्रकरण?

त्याचवेळी मंत्री कराड म्हणाले की, राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गटाला किती जागा मिळणार याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशपातळीवरील नेते निर्णय घेतील, मात्र आम्ही 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री कराड यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांची शिवसेना आणि आम्ही भाजप एकच आहोत, म्हणजे आमचं लक्ष्य एकच आहे. आम्ही विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद यामध्ये आम्ही एकत्रच लढणार आहोत, असेही यावेळी मंत्री कराड यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगरच्या नामांतरणाविषयी मंत्री कराड यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी सांगितले की, अहमदनरच्या नामांतरणासाठी अहमदनगर महानगपालिकेमधून ठराव पास करुन राज्य सरकारकडे द्यावा लागेल आणि राज्य सरकारला केंद्राकडे मागणी करावी लागेल.

राहुल गांधीचे इंग्लंडमधील वक्तव्य भारत देशाला बदनाम करणारे होते. भारत देशाची लोकशाही देशातील एक नंबरची लोकशाही आहे. मोठ्या लोकशाहीचा देश आहे. येथे सर्वांना स्वातंत्र्य आहे. तरीसुद्धा त्यांनी तिथं सांगितलं की, भारतात लोकशाही नाही. असं म्हणणं चुकीचं आहे. कोर्टाने निर्णय घेतल्याने आता त्यांची खासदारकी गेली आहे. राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलतात, महाराष्ट्रात सावरकरांबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं आहे. सावकरसुद्धा स्वातंत्र्यसेनानी होते, देशप्रेमी होते, त्यांनीसुद्धा कारावास भोगलेला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube