थोरात सहकारी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार

थोरात सहकारी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार

अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलाय.

पुण्यातील मांजरीत झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांनी हा पुरस्कार स्विकारलाय. नॅशनल फेडरेशन ऑफ को ओपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे होते. आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा आदर्शवत पॅटर्न म्हणून राज्यात व देशात दिशादर्शक ठरत आहे. या सहकार मॉडेलचा पुन्हा एकदा राज्यपातळीवर गौरव झाला आहे.

मागील अनेक वर्षे ऑडिटचा अ दर्जा राखून सातत्याने सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. उपक्रमशीलता कायम ठेवून जलसंधारण व तालुक्याचे हदय म्हणून काम करतांना कमी पाऊस असून ही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला.

मागील हंगामात 15 लाख 51 हजार टन टनाचे उच्चांकी गाळप करून विक्रमी भाव दिला आहे. तसेच सतत ऊस विकाससासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. दरम्यान, सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेरच्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जयंत पाटील, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, व्हीएसआयचे संभाजी कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube