NCP Crisis : पवारांकडून बोध घ्या; गुलाबरावांनी राऊतांना डिवचलं

NCP Crisis : पवारांकडून बोध घ्या; गुलाबरावांनी राऊतांना डिवचलं

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट (NCP Crisis) पडली आहे. सत्ताधारी गटातीलच नाही तर विरोधी पक्षांतील नेतेही असेच बोलत आहेत. असे असतानाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मात्र पक्षात कोणतीच फूट नाही असे वारंवार सांगत आहेत. तितक्याच ताकदीने लोकांसमोर जात सभाही घेत आहेत. यावरूनच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावत डिवचलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  (NCP Crisis) एकमेकांविरुद्ध सभा घेणं सुरू आहे तरीही राष्ट्रवादी एकसंघ असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. पक्षा कसा सांभाळायचा हे संजय राऊत यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार यांच्याकडून बोध घ्यावा असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटावर टीका केली.

सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या : मराठी माणसाने हे विसरता कामा नये!

शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी जास्त भाष्य करणे टाळले. पाटील म्हणाले, नेतेपदाची राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Crisis) अंतर्गत बाब आहे. कोण कोणाचे नेते आहेत. हे पक्षानेच ठरवायचे आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादीत असलेले एकमेव सर्व आपलेच असल्याचे म्हणत आहेत. तर दुसरीकडे एकमेकांविरुद्ध सभाही घेत आहेत. दोन्ही नेत्यांची वक्तव्ये तपासली तर राष्ट्रवादीत सर्व एकजुटीने चालले आहे तसेच हे सर्व समजुतीने काम झालेले आहे असा शिक्कामोर्तब जनतेतून होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीत फूट पडली (NCP Crisis) तरी पक्ष एक असल्याचे भासवले जात आहे. त्यामुळे पक्षात फूट पडली असली तरी पक्ष कसा सांभाळायचा याचा बोध संजय राऊतांनी शरद पवार यांच्याकडून घ्यावा, असे पाटील म्हणाले.

नवाब मलिकांची भूमिका गुलदस्त्यात असतानाच CM शिंदेंनी टाकला डाव; तुकाराम कातेंचा शिवसेनेत प्रवेश

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube