‘नार्वेकरांनी निकाल काहीही दिला तरी..,’; निकालाआधीच आमदार तनपुरेंचं विधान चर्चेत…

‘नार्वेकरांनी निकाल काहीही दिला तरी..,’; निकालाआधीच आमदार तनपुरेंचं विधान चर्चेत…

Ahmedangar News : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष बाबत आज महाफैसला होणार आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यानंतर सुरु झालेले कायदेशीर लढाई आता अंतिम निकालापर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांविरोधात दाखल अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवार दुपारी निर्णय देणार आहेत. त्यापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी महत्वाचे विधान केले आहे. आज विधानसभा अध्यक्षांनी काहीही निकाल दिला, तरी justice delayed is justice denied. आज खोके संस्कृतीला राजमान्यता मिळू नये अशी भाबडी आशा अशी प्रतिक्रिया तनपुरे यांनी दिली आहे.

तुकाराम मुंडेंची पुन्हा उचलबांगडी : पारदर्शकतेचा आग्रह धरताच दीपक केसरकरांकडून ‘गेम’

महाफैसल्याकडे राज्याचे लक्ष…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज काही वेळात आमदार अपात्रतेवर निकाल देणार आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वाण देखील मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाच्या बाजूने निकाल लागणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र केले तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक चर्चा सुरु आहे.

MLA Disqualification Case : काऊंट डाऊन सुरू, घडामोडींना वेग; राज्यासह देशाचं निकालाकडे लक्ष

तनपुरे नेमकं काय म्हणाले?
आज विधानसभा अध्यक्षांनी काहीही निकाल दिला, तरी justice delayed is justice denied. छत्रपतींनी लुटलेल्या सुरतेत जाऊन दिल्लीच्या तख्तासमोर शरणागती पत्करून आमच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांना आज दीड वर्षाहून अधिक काळ लोटला गेला आहे. अजून देखिल ही दिल्लीश्वरांची मांडलिक मंडळी निकालाची वाट पहात सत्तेची रसाळ फळे चाखत आहेत. आज खोके संस्कृतीला राजमान्यता मिळू नये अशी भाबडी आशा अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

दरम्यान, काही वेळानंतरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. या निकालाकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून असं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी केलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानाचीच चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube