न्यू आर्टस् कॉलेज पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

न्यू आर्टस् कॉलेज पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

New Arts Parner College Grade A++ in NAAC Reevaluation : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील पारनेर (Parner) येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजला (New Arts Commerce and Science College)नॅक पुनर्मूल्यांकनात A++ ग्रेड मिळाला आहे. पारनेर कॉलेजचे नॅक पुनर्मूल्यांकन नुकतेच पार पडले. त्यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नॅक पुनर्मूल्यांकनात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत उत्तराखंड येथील कुलगुरु होशीयार धामी(Hoshiar Dhami), कर्नाटक येथील रंगप्पा आणि अरुणाचल प्रदेश येथील खांडू हे सर्व सदस्य सहभागी झाले होते.

महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी

पारनेर कॉलेज हे अद्ययावत संगणकीकृत महाविद्यालय, उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा असलेले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट प्राचार्य या पुरस्कारांबरोबरच विद्यापीठ व राज्यस्तरीय पातळीवर 35 आणि राष्ट्रीय स्तरावर 18 पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
 
महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे दूरदृष्टी असलेले सर्व संस्था पदाधिकारी, प्रा. डॉ. रंगनाथ आहेर, कर्तव्यदक्ष अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग आणि कॉलेजचे सर्व प्राध्यापक यांच्यामुळे महाविद्यालय दिवसेंदिवस उंच भरारी घेत आहेत.
       
महाविद्यालयाच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube