मुलगी झाली हो! सनई-चौघड्यांच्या गजरात लेकीचे अनोखे स्वागत
Newborn baby girl welcome : आजही समाजात मुलगा यालाच वंशाचा दिवा समजला जातो. मुलगा झाला की गावभर पेढे वाटून त्याच्या जन्माचे स्वागत केले जाते, अशा घटना आपण आजवर ऐकल्या तसेच पाहिल्या असतील. तर दुसरीकडे मुलगी झाली म्हणून नाराज होणे, तिचा तिरस्कार करणे आदी घटना देखील समाजात घडत आहे. असे असताना मात्र अहमदनगरमधील एका कुटुंबीयांनी स्त्री जन्माचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात साजरे करत समाजाला एक अनोखे दर्शन घडवून आणले आहे. मुलगी झाली हो…लक्ष्मी आलो हो… असे म्हणतच या चिमुरडीचे स्वागत तिच्या कुटुंबीयांनी केले.
अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील कावळे कुटुंबामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल तीन पिढ्या नंतर मुलीचा जन्म झाला. यामुळे कुटुंबियांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. आपल्या घरात जन्मलेल्या लक्ष्मीचे स्वागत म्हणून सनई चौघडे, रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. कुटुंबियांच्या या आनंदात नातेवाईकांसह आजूबाजूच्या नागरिकांनी देखील सहभाग घेतला. यावेळी नातेवाईकांनी फुलांची उधळण करत स्री जन्माचे स्वागत केले.
तिच्या स्वागतासाठी सजले घर
मुलीच्या जन्माच्या स्वागत म्हणून कावळे परिवाराच्या घरामध्ये भव्य अशी फुलांची सजावट करण्यात आली. तसेच तिच्या आगमनासाठी सज्ज असलेल्या रथाला देखील विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुलीचा जन्म झाल्याने त्या गोंडस मुलीचे स्वागत वाजत गाजत केले. यावेळी सनई चौघडे आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केलं.
Dipika Kakar Quits Acting: ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्करचा अभिनयाला रामराम
दरम्यान कन्यारत्नाचे घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईला औक्षण केले. ज्या मार्गाने लक्ष्मी घरात आली तिचा येणार मार्ग हा फुलांनी सजवण्यात आला. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली आपल्या घरी आली, या भावनेने तिची पाऊलं कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली गेली. त्यानंतर देवघरात दर्शन घेऊन चिमुकलीला आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवण्यात आले. लेकीच्या स्वागतसाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. याचवेळी कुटुंबीयांकडून एक आगळा संदेश देत मुलगी वाचावा, असा संदेश दिला.