शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्विट करणारा झाला भाजपचा पदाधिकारी

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 04T124229.673

Nashik Nikhil Bhamare Join Bjp Media Cell : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आणि महिनाभर तुरूंगवास भोगलेल्या तरूणास भाजपनं मोठी जबाबदारी दिली आहे. निखिल भामरे असे भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्त करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. भाजपच्या या नियुक्तीमुळे आगामीकाळात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले

काय केले होते ट्विट?

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाण्यातील आहे. गेल्या वर्षी निखिलने पवारांविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. ज्यात त्याने “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.” असे लिहिले होते. निखिल या ट्विटनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या ट्विट प्रकरणी निखिलवर राज्यात विविध ठिकाणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती.

साधरण महिनाभर त्याने या प्रकरणी तुरूंगवासही भोगला होता. त्यानंतर आता याच निखिलची भाजपकडून मीडिया सेलच्या सहसंयोजकपदी निवड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या या नियुक्तीमुळे आगामीकाळात भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप

निखिलने मानले होते फडणवीसांचे आभार

वादग्रस्त ट्विटनंतर निखिलची महिनाभरानंतर तुरूंगातून सुटका करण्यात आली. यानंतर निखिलने ट्विट करत फडणवीसांचे आभार मानले होते. यात त्याने कठीण काळात भक्कमपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे मनापासून आभार असे म्हणत आपण केलेल्या मदतीसाठी मी सदैव ऋणी राहील असे निखिलने म्हटले होते. याशिवाय त्याने न्यायालयात त्याच्या बाजूने बाजू मांडणाऱ्या लिगल टीमचेही आभार मानले होते.

Tags

follow us