‘आता त्यांना आनंद घेऊ द्या मी व्यत्यय आणणार नाही पण, वेळ आल्यावर’.. विखेंचा थोरातांना इशारा
Ganesh Sugar Factory Election : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Sugar Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पॅनलने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. कारखान्यातील 19 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष थोरात-कोल्हे गटाकडून साजरा केला जात असतानाच विखे पाटील यांनी आक्रमक होत रोखठोक इशारा दिला आहे.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मंत्री विखे यांनी आज प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पराभवावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. शेवटी सभासद कारखान्याचे सर्वस्वी असतात. त्यामुळे त्यांनी जो निर्णय केला तो आम्ही स्वीकारला आहे. त्यापेक्षा वेगळी भूमिका असण्याचे काही कारण नाही. उत्साहाच्या भरात भान विसरून काही मंडळी आता टीका करत आहेत. त्याचा आनंद त्यांना घेऊ द्या मला काही त्यात व्यत्यय आणायचा नाही. पण, वेळ आल्यावर त्या संदर्भात नक्कीच बोलू, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल
ही सुरुवात लक्षात ठेवा – थोरात
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम झाले. ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा देत काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिला. थोरात म्हणाले, राजकारण करत असताना दशहतीवर राजकारण करायचं, लोकांना पिळून राजकारण करायचं, त्यांना गुलाम बनवून राजकारण करायचं, त्यांची मानसिकता हालाखीची करायची आणि मग म्हणायचं की मतं द्या नाहीतर पाहून घेईल. मग लोक मतं टाकतात, ही राजकारण करण्याची पद्धत दुर्दैवाने या भागात आहे. या पद्धतीला सुरुंग लावण्याचे काम आणि दहशतीचे झाकण उडवून लावण्याचे काम या निमित्ताने झाले आहे.
दरम्यान,१९ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत कोल्हे थोरात गटाने गणेश परिसरावरील आपलं वर्चस्व अधोरेखित केले. मतमोजणीनंतर निकाल जसजसे घोषित होत होते. तसा थोरात कोल्हे गटाच्या कार्यकर्त्ये गुलाबाचे मुक्त उधळण करून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष करीत होते.
मंत्रिपद असतानाही विखेंचा थोरातांकडून ‘गणेश’मध्ये करेक्ट कार्यक्रम !