Ram Shinde : 2024 फार लांब नाही, ‘मी तयारच’; राम शिंदेंनी पवारांविरोधात ठोकला शड्डू!

Ram Shinde : 2024 फार लांब नाही, ‘मी तयारच’; राम शिंदेंनी पवारांविरोधात ठोकला शड्डू!

Ram Shinde vs Rohit Pawar :  कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप करत शिंदे यांना इगो आहे त्यांना इतकाच इगो असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले होते.

त्यांच्या या आरोपांवर आज भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनीही रोखठोक उत्तर देत रोहित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने विधिमंडळाच्या आवारात आ. शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी रोहित पवार यांनी दिलेले आव्हान स्वीकारण्यास तयारच आहे, असे सांगितले.

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट! ठाकरेंच्या मुलाखतीवर बानवकुळेंचा टोला

माझ्या मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदे आहेत असा आरोप कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. 25 वर्षांपूर्वीच येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. 25 वर्षांच्या इतिहासात मी देखील प्रयत्न केले परंतु, तेथे उद्योग काही आले नाहीत. तुमचं देखील सरकार (महाविकास आघाडी) होतं. कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघातील दोन तालुके आहेत. तिथे का उद्योग नाही आणले? तिथे का नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला? असे सवाल त्यांनी केले.

कर्जतची एमआयडीसी झालीच पाहिजे. मी सुद्धा 2009 पासून यासाठी प्रयत्न करत आहे. एमआयडीसीसाठी अनेक वेळा लक्षवेधी आणली. तारांकित प्रश्न उपस्थित केले. या माध्यमातून हा प्रश्न मी विधीमंडळात विचारला. आज देखील नियम 97 अन्वये हा विषय मी चर्चेसाठी आणला आहे. या संदर्भात मी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारणार आहे, असे शिंदे म्हणाले.

केंद्रात मंत्री मराठी अन् महाराष्ट्रातीलच रस्त्यांची दुरावस्था : मुलावरील टीकेनंतर ठाकरेंचं गडकरींवर तोंडसुख

माझं डबल विकासाचं राजकारण

रोहित पवार म्हणाले की मी विकासाचं राजकारण करतो तर हे अडवणुकीचं राजकारण करतात या आरोपावर शिंदे म्हणाले, मी डबल विकासाचं राजकारण करतो. आता तुम्ही मतदारसंघात जाऊन विचारा की विकास कुणी केला आणि भूलभुलैय्या कुणी केला. यावर त्यांनी देखील चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला.

24 फार लांब नाही पाहू मैदानात काय होतं

राम शिंदेंना इगो खूप आहे इतकाच इगो असेल तर मैदानात या, असे आव्हान रोहित पवार यांनी दिले होते. यावरही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन महिन्यांत दोन धमक्या दिल्या आहेत. 24 फार लांब नाही मी पूर्ण तयारीनिशी तयार आहे. पाहूया मैदानात काय होतंय ते असे थेट प्रतिआव्हान शिंदे यांनी दिले. त्यामुळे या मतदारसंघातील आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube