Ahmednagar Crime : पेट्रोल पंपावर घुसून मॅनेजरची हत्या करणारे दोघे ताब्यात तर एक पसार

Ahmednagar Crime : पेट्रोल पंपावर घुसून मॅनेजरची हत्या करणारे दोघे ताब्यात तर एक पसार

Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. आता कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज बाबुराव घणघाव ( वय ४० वर्षे रा. दहेगाव बोलका, कोपरगाव) असे मयत पेट्रोल पंप मॅनेजरचे नाव आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून ही हत्या झालीआहे. या हत्याकांडातील दोघा आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी शिर्डी आणि नाशिक येथून जेरबंद केले आहे. तर अन्य एक जण फरार झाला असल्याची माहिती मिळते आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. (Petrol Pump Manager Killed Two arrested and one ran )

Video : ‘लढाई होती देव, देश अन् धर्मासाठी’; वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेकडून खास व्हिडीओ जारी

काय आहे ही घटना?

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गुरुराज एच.पी.पेट्रोल पंप येथे भोजराज घनघाव हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. दि. २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर तिघे आरोपी आले. तिघांनी येऊन फिर्यादिकडे येवुन त्याने फिर्यादिस धक्काबुक्की केली.

Ameya Khopkar यांनी पाकिस्तानी कलाकार अन् निर्मात्यांना दिला दम; म्हणाले, तंगड्या तोडून…

अमोल धोंडीराम मोहिते (वय-२५) या कामगारांसोबत वाद घातला. दरम्यान हे वाद पाहून व्यवस्थापक भोजराज बापुराव घनघाव (मयत) हे तिथे आले. त्यांनी येत तुम्ही आमच्या माणसाला मारहाण का केली> अशी विचारणा आरोपींना केली. त्याचा राग एका इसमाने आपल्या कमरे जवळुन धारदार चाकु काढुन व्यवस्थापक भोजराज घनघाव,रा.दहेगाव बोलका यांची गंचाडी धरुन चाकुने त्यांचे पोटात व खांदयावर वार करुन त्यांस जिवे ठार मारले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. तसेच पोलिसांनी पेट्रोल पंपावरून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी फिर्यादी अमोल धोंडीराम मोहिते याच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलीस शोध घेत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिर्डी व नाशिक येथील संशयित ठिकाणी धाडी टाकल्या असता त्यातील आदित्य रूचके यासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर अन्य एक जण पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी आला आहे. दरम्यान फरार आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube