वीज पुरवठा खंडित, अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 07 At 10.21.41 PM

Ahmednagar city’s water supply disrupted अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा उद्या (शनिवारी) विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच रात्री 9 वाजेच्या सुमारास पुन्हा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे आज दुपारी चार वाजेच्या नंतर शहराच्या उपनगरांत पाणी पुरवठा करता आलेला नाही.

एमएस धोनीच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारकाचे उद्घाटन, पाहा व्हिडिओ 

वितरण व्यवस्थेच्या टाक्या भरण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झाल्याने शनिवार (ता. १८) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Tags

follow us