मराठा समाजाकडूनही अहमदनगरमध्येही ‘नो प्री वेडिंग शूटिंग’ वर शिक्कामोर्तब

Untitled Design   2023 06 01T145821.610

Pre Wedding Shoot Baned : लग्न सोहळा म्हंटले की मोठी तामझाम ही असते. मात्र आता लग्नसोहळा व त्याअनुषंगाने असलेली काही फंक्शन्स ही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. यातच सध्या ट्रेंड असलेला ‘प्री वेडिंग शूट’ यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. यातच अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना ‘प्री वेडिंग शूटिंग’ करू नये असा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान अनेक समाजाकडून देखील या पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

नगर जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष जेष्ठ उद्योगपती चंद्रकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची नुकतीच शहरात बैठक झाली . यात मराठा समाजाने प्री वेडींग शुटींगला समाजातील सर्वानीच पायबंद घालावा असा ठराव केला . यावेळी सी .ए. राजेंद्र काळे , शिवजीत डोके , डॉ .मोरे , किशोर मरकड, निखील वारे , बाळासाहेब पवार हे प्रमुख प्रतिनिधी उपस्थीत होते . या ठरावाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला दिले आहे. त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा असे आवाहन नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

दरम्यान आजकाल लग्नसोहळे हे मोठे थाटात पार पडले जाण्याचे प्रमाण हे वाढले आहे. अनेकांची परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून लग्नापूर्वी करण्यात येणारे ‘प्री वेडिंग शूटिंग’ वर मोठा खर्च केला जात असल्याचे समोर आले आहे. एवढा खर्च करून आपले वैयक्तिक खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रुढ झाली आहे.

हे असे सुरु असल्याने याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव केला. याशिवाय भविष्यात एक गाव एक विवाह ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही ठरले.

प्री वेडींग चे छायाचित्रन करताना पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असुन आपल्या संस्कृतीच्या हे विरोधात आहे . यातुन अनेक अनुचित प्रकार ही घडुन येत आहेत . यामुळे मराठा समाजाने प्री वेडींग शुटींग पासुन दूर राहवे असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत गाडे यांनी केले आहे

Tags

follow us