मोठी बातमी : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन विश्वस्तामध्येच हाणामारी

  • Written By: Published:
मोठी बातमी : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन विश्वस्तामध्येच हाणामारी

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या (Madhi temple) विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला. अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग ! 

गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या हाणामारीच्या घटनेनंतर सर्व जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धूसफूस सुरू होती. म्हणूनच आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंदिराच्या सभागृहात विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

दाऊदसारखाच अमोल शिंदेही ‘दहशतवादी’ ठरणार! धडकी भरवणारा UAPA कायदा काय आहे? 

या बैठकीत अध्यक्ष बदलाबाबतचा निर्णय बहुमताने घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतांनाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरू असतांना काही स्थानिक तरुण त्या वादात पडले. त्यामुळं वाद वाढला. अखेर बाचाबाचीचं रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारीपर्यंत गेलं.

दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीनं उपस्थित गावकऱ्यांमध्ये एकच धांदल उडाली आहे. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्यानं यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती. जखमींवर सध्या उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube