जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का: बंडखोर संजय पवार विजयी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या मदतीने बंडखोर संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आमने-सामने आल्यानंतर निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता. यामध्ये 20 पैकी 11 मते संजय पवार यांना मिळाली आहेत. रवींद्र पाटील यांना 10 मते मिळाली आहेत. काँग्रेसने बंडोखोरी केल्याने आपल्याला पराभव स्विकारावा लागला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Ashish Deshmukh यांचं थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पराभव अतिशय धक्कादायक आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. त्यांचा विजय देखील निश्चित मानला जात होता. काही क्षणात राजकीय घडामोडी घडल्या आणि संजय पवार विजयी झाले.
संजय पवारला समर्थन देतील ही शिवसेनेकडून अपेक्षा नव्हती. काँग्रेसने देखील त्यांना समर्थन दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये अशाप्रकारची आम्हाला अपेक्षा नव्हती. ह्या लोकांना विश्वासघात केला आणि त्यामुळे आम्हाला जिल्हा बॅंकेत धोका झाला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
पुढं एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादीचे दहा मते एकत्र राहिले. त्यामध्ये एक मत फुटले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुका लढवायला कोणीही तयार नव्हते अशी मधल्या कालखंडात परिस्थिती होती. सर्वांच्या मदतीने मी पुढाकार घेऊन ही बॅंक आमच्या ताब्यात आणली.