VIDEO: शनिशिंगणापूर ट्रस्ट घोटाळा : अधिकाऱ्याच्या आत्महत्येने एक कडी तुटली ?

  • Written By: Published:
VIDEO: शनिशिंगणापूर ट्रस्ट घोटाळा : अधिकाऱ्याच्या आत्महत्येने एक कडी तुटली ?

Shani Shingnapur Devsthan Scam officer end life: गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथील शनेश्वर देवस्थान हे विविध मुद्द्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिलंय. नोकरभरती, बनावट ॲपमधून कोट्यावधींच्या देणग्या गोळ्या केल्यामुळे राज्य सरकारने ट्रस्टची चौकशी लावलीय. मुंबईतील धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ही चौकशी सुरू असून, ट्रस्टींना चौकशीसाठी 1 ऑगस्टला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु त्यापूर्वीच देवस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी जीवनायात्रा संपविली आहे. घोटाळा कुणी केला ? त्यात नितीन शेटे यांचा किती सहभाग हे भविष्यात समोर येईल. परंतु या घोटाळ्यामुळे एक जीव गेलाय आणि घोटाळ्यातील एक कडी म्हणजेच लिंक तुटलीय असं म्हटलं जातंय.



I love you beta… आणि बरंच काही…!

मयत नितीन शेटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवाशाला नेण्यात आला आहे. तत्पूर्वी प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं, की मयत नितीन यांच्या अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट बर्मुडा होता. टी-शर्टवर I love you beta ही अक्षरे होती. ते नेहमी वापरत असलेल्या चष्मा एका बाजूला होता. ते पांघरत असलेल्या ब्लॅंकेटची व्यवस्थित घडी घालून तो एका बाजूला ठेवण्यात आला होता. त्यांचा मोबाईल मात्र घटनास्थळी कुठेच नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यावरून मयत नितीन शेटे पाटील यांच्या आत्महत्या पाठीमागे नक्की कोणकोणती कारण असावीत, याचा अंदाज पोलीस कशा पद्धतीने बांधतील, हाच खरा प्रश्न आहे.


खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम, त्यांना कॉल करून बोलावलं अन् अडकवलं; इथिकल हॅकरचा दावा


बनावट अॅप ते नोकरभरती

काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. यामध्येच या देवस्थानामध्ये बनावट ॲपद्वारे कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा देखील आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यापाठोपाठ नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देवस्थानमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार तसेच बनावट ॲप बोगस कर्मचारी भरती यावरून विधानसभेमध्ये आवाज उठवला होता.

घरात दारूची पार्टी कायदेशीर? रेव्ह पार्टी म्हणजे काय? वकिलांनी सांगितली व्याख्या अन नियम…

त्यानंतर या प्रकरणाची मोठी व्याप्ती पाहता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले होते. दरम्यान चौकशीच्या आदेश निघाल्यानंतर विश्वस्त मंडळ यांच्यामध्ये काहीशी चलबिचल तयार झाली होती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केले जातेय. देवस्थानामध्ये झालेल्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये काही राजकारण्यांचा देखील समावेश असल्याचा देखील तर्कवितर्क लावले जात होते.

देवस्थान समिती ही प्राथमिक चौकशीच्या भोवऱ्यात होती. मात्र तोच पूर्वी आज सोमवारी शनिश्वर देवस्थान ट्रस्टचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली. मात्र त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा संबंध लावला जात आहे.


नितीन शेटे गडाख यांचे खंदे समर्थक

आत्महत्या करणारे नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. यातच देवस्थानांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार या मुद्द्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थेट गडाखांवरती आरोप केले आहेत. एकीकडे शनिशिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार चौकशी सुरू असतानाच गडाख यांचे खंदे समर्थक असलेले शेटे यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणाची त्यांचा खरच काही संबंध आहे का आता या गोष्टीची चर्चा सुरू झालेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube