खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम, त्यांना कॉल करून बोलावलं अन् अडकवलं; इथिकल हॅकरचा दावा

खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम, त्यांना कॉल करून बोलावलं अन् अडकवलं; इथिकल हॅकरचा दावा

Pune Rave Party: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khevalkar) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) रेव्ह पार्टी (Rave Party) करताना रंगेहात पकडले. पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर छापेमारी करत पोलिसांनी खेवलकर यांच्यासह काही लोकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या रेव्ह पार्टीबद्दल इथिकल हॅकर मनीष भंगाळे (Manish Bhangale) यांनी खळबळजनक दावा केलाय. प्रांजल खेवलकर यांचा या रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय.

पहलगाममध्ये ते दहशतवादी घुसलेच कसे?, काँग्रेसच्या रंजन गोगोईंकडून सरकारवर थेट प्रश्नांचा भडीमार 

पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टीबद्दल बोलताना हॅकर मनीष भंगाळे म्हणाले की, खडसेंच्या जावयाचा आणि या पार्टीचा दूरपर्यंत संबंध नाही. उलट, त्यांनाच फोन करून पार्टीच्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि प्रांजल तिथे पोहोचताच छापेमारी करण्यात आली. या प्रकरणातील ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, त्या माझ्यासमोर आल्या आहे. जी माहिती मी गोळा केली, त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की हा सर्व ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं. त्यांना तिथे बोलावण्यात आलं होतं आणि ते या जाळ्यात फसले गेले. बाकी त्यांचा या रेव्ह पार्टीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

Supriya Sule Exclusive : राष्ट्रवादीचं मनोमिलन ते आव्हाडांच्या आरोळ्या, राजकारण फिरवणारी मुलाखत 

पुढं बोलताना भंगाळे म्हणाले की, पार्टीतील लोकांनाही ते ओळखत नाही, यापूर्वी ते पार्टीतील लोकांच्या संपर्कात देखील नव्हेत. मी एक-दोन दिवसांत पुणे पोलिसांना या सर्व तांत्रिक बाबी सांगणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, प्रांजल यांच्याविरोधत सर्वकाही कट रचला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भंगाळे हे एकेकाळचे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. यापूर्वी त्यांनी खडसेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, त्यांनी खडसेंच्या जावयांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळ या प्रकरणाला वेगळं वळण आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube