शरद पवारांचा अहमदनगर दौरा अचानक रद्द!

शरद पवारांचा अहमदनगर दौरा अचानक रद्द!

Sharad Pawar :  अहमदनगर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय महामंडळाचे अधिवेशन रविवारी सकाळी अहमदनगर येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार होते.  मात्र शरद पवार यांचा नगर दौरा हा रद्द झाला आहे. शरद पवार त्या दिवशी दिल्ली येथे असल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते आहे

रविवारी सकाळी दहा वाजता अहमदनगर शहरातील एन आर लोन येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय महामंडळ अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार होते. या अधिवेशनासाठी राज्यभरातून तब्बल दहा हजार शिक्षक उपस्थित राहणार होते. याबाबतची माहिती राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हसे यांनी दिली होती. दरम्यान, शरद पवार हे अहमदनगरला येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या परस्पर हकालपट्टी अन् प्रचंड गदारोळ; अमित शाहंच्या फोननंतर राज्यपालांची माघार

दरम्यान शरद पवार यांचा रविवारी नगर जिल्हा दौरा हा रद्द झाला आहे. एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पवार हे जाणार असल्याने नगर जिल्हा दौरा हा रद्द झाला आहे, अशी माहिती माहिती नगर शहराचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.

ठाकरेंच्या एकजुटीचे टायमिंग चुकले? महापालिकेवरील मोर्चावरुन शिवसेना (UBT) वर टीका

दरम्यान, आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका या होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षातील नेते मंडळींचे दौरे  सुरू आहेत. यातच शरद पवार हे नगरला येणार असल्याने मोठी राजकीय घडामोडी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अचानक दिल्ली दौरा असल्याने शरद पवार यांचा नगर जिल्हा दौरा हा रद्द झाला आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube