Ahmednagar Crime : धक्कादायक ! माजी सरपंचावर तलवारीने हल्ला…

Untitled Design   2023 02 08T123658.339

अहमदनगर : श्रीगोंद तालुक्यातील ढवळगाव येथील माजी सरपंच विजय मारुती शिंदे यांच्यावर दोन जणांनी दुचाकीवरून येत तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ला करून हे हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ढवळगावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांचे पती माजी सरपंच विजय मारुती शिंदे हे मंगळवारी 7 फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ढवळगाव येथील एका हॉटेलच्या पाठीमागे यात्रेसाठी आलेल्या मित्रांबरोबर बोलत उभे असताना त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन इसमानी शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्याला प्रतिकार करत शिंदे यांनी तलवारीचा वार चुकविला. मात्र, झालेल्या झटापटीत शिंदे यांच्या हाताला तलवारीचा निसटता वार लागून ते जखमी झाले. या प्रकरणी रात्री उशिरा बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags

follow us