बिबट्याच्या कातडीसह नखांची तस्करी, टोळी जेरबंद 

बिबट्याच्या कातडीसह नखांची तस्करी, टोळी जेरबंद 

अहमदनगर : शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शेरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वन विभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे.

 

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसूबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापूर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याची नखे आणि काही अवयव काढून त्याच्या शरीराचा बाकीचा भाग जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता.

आठवडाभरानंतर बिबट्याची नखे विक्रीसाठी आलेल्या तस्करांना शहापूरच्या वन विभागाने चांढे नाक्यावर नकली ग्राहक पाठवून ताब्यात घेतले. भाऊ गांगड (वय ३४), काळू गिऱ्हे (वय २४) आणि पांडुरंग उघडे (रा.उडदावणे) या तिघांना ताब्यात घेऊन बिबट्याची सहा नखे व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube