सगळे पाप खोके, ट्रीपल इंजिन सरकारचे; हेरंब कुलकर्णींची भेट घेताच सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

  • Written By: Published:
सगळे पाप खोके, ट्रीपल इंजिन सरकारचे; हेरंब कुलकर्णींची भेट घेताच सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

Supriya Sule on social activities Heramb Kulkarni attack: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. शाळेजवळ गुटखा विक्रीला विरोध केल्यामुळे हा हल्ल्या झाल्याचे कारण समोर येत आहे. हेरंब कुलकर्णी यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज नगरमध्ये भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी जोरदार सुनावले आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना अटक होणार? कारण…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मीही गुटखा विक्रीला विरोध केला आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना एका फटक्यात गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. हा सामाजिक कार्यकर्ता तुमच्या, आमच्या लेकरांसाठी लढतो आहे. मुलांना घाणेरड्या सवय लागू नयेत. चांगले संस्कार मिळाव्यात, यासाठी तो प्रयत्न करते. पण त्यांच्यावर नगरमधील मोकाट चोर, मोकाट गुटख्यावाले, दारुपार्टीवाल्यांनी हल्ला केला आहे.

Caste Census : काँग्रेसची मोठी घोषणा; काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना

हा सामाजिक कार्यकर्त्या तुमच्या मुलाच्या हितासाठी त्याचे डोके फोडून घेत आहे. या हल्ल्याचे सगळे पाप खोके सरकार, ट्रीपल इंजिन सरकारचे आहेत. काय विश्वासाच्या नात्यांनी नगरकरांनी यांना मते दिली असतील, असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. हेरंब कुलकर्णी यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी या केसच्या मी पाठपुरावा करणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

या सर्वांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. मंत्रिपद भूषविता, प्राइव्हेट प्लेनने फिरत आहेत. लाल दिव्यांच्या गाड्या घेऊन गावभर फिरून मते मागत आहे. मते आणि सत्ते यांना हवी कशाला ? पोलिस अधीक्षक व पोलिसांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, बिचारे गृहमंत्री

अदृश्य शक्तीचा हात असल्याने अशी हिम्मत आता होत आहे. नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. परंतु गृहमंत्री फडणवीस हे बबलूसारखे गुन्हेगारी आपल्याबरोबर घेऊन फिरतात, असा आरोपही सुळे यांनी केला आहे. आधी ते दहा गुण घेऊन मुख्यमंत्री होते. आता बिचारे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असे अडीच मार्कावर आलेले आहे. 105 आमदार असताना ते नापास झालेले असल्याची टीकाही सुळेंनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube