सातव्या दिवशी यशस्वी चर्चेनं मिटला संप; शिक्षकांचा विजयी जल्लोष

सातव्या दिवशी यशस्वी चर्चेनं मिटला संप; शिक्षकांचा विजयी जल्लोष

अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी (old pension scheme)सरकारी कर्मचाऱ्यांनी (government employee Strike)पुकारलेला संप सातव्या दिवशी राज्य सरकारसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर मिटला आहे. न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयासमोर (New Arts College Ahmednagar)शिक्षकांनी विजयी जल्लोष साजरा केला आहे. कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. संप काळात विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका (extra hours)घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे आदी उपस्थित होते.

Maharashtra Politics : अनिल जयसिंघानी प्रकरणावरून आदित्य ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी…”

राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्‍वास काटकर यांनी केली आहे. लेखी आश्‍वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितल्याने अहमदनगर शहरात संप स्थगित करुन आज संध्याकाळी जल्लोष करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मागे घेतला आहे. आज मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली होती, पहिल्यांदा कर्मचारी संघाने ही समिती नाकारली होती. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा संप माघारी घेत असल्याचं जाहीर केलं.

संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून सर्व कर्मचारी कामावर उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube