संगमनेरात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

  • Written By: Published:
Ahmednagar

Ahmednagar : संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात प्रवरा नदीतील डोहामध्ये शेळ्या-मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून तर वडगावपान येथे तिसऱ्या तरूणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
 
आज दुपारी नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा नदीतील डोहामध्ये सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६, रा. धुळवाडची डोंगरची वाडी, ता. सिन्नर, जि.नाशिक), शुभम रावसाहेब कोटकर (वय २०, रा. पिंपळे, ता.संगमनेर) हे दोघेजण शेळ्या- मेंढ्या घेऊन धुण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मेंढ्या धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात दोघेजण बुडाले. दुसऱ्या घटनेत वडगावपान येथील रवींद्र संपत थोरात (वय ३१) हा तरूण विहिरीतील पाण्यात पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Tags

follow us