यापुढं आम्ही…; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश वादावर मिरवणुक काढणाऱ्यांची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T184215.933

Triyambakeshwar Temple Contraversy :  त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच मंदिरात बंदी असताना प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले.

यानंतर आज 17 मे रोजी त्र्यंबकेश्वर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही समाजाचे लोक या सभेत सहभागी झाले होते. दरवर्षी संदर मिरवणूक काढणारे सलीम सय्यत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलत होते.

जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत जयंत पाटलांचं मोठं विधान…

आमंच चुकलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला माफ करावं, आम्ही माफी मागतोय. यापुढं आम्ही धूप दाखवणार नाही. ही प्रथा आम्ही बंद करुन टाकू. हे माझे वडील करायचे. पण आता जाऊदे, आपल्या गावात भाईचारा आहे. यामुळे वातावरण चिघळत आहे. गावामध्ये सगळे भाऊबंद आहेत. याच समाजात मी लहानाचा मोठा झालो असून आम्ही एकमेकांच्या घरी अन्न खाल्लं आहे, असे ते म्हणाले आहेत.

पुरंदरमध्ये शिवतारेंना टेन्शन, राष्ट्रवादीचा दिग्गज नेता करतोय भाजपात प्रवेश

धूप दाखवण्याचे काम आधी माझे वडील करायचे. यानंतर ते मी करायला लागलो. आम्ही फक्त मंदीराच्या मुख्य दरवाज्यातील पहिल्या पायरीवर एक दोन सेकंद उभं राहून उद टाकून आम्ही निघून जातो. पण आता जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

Tags

follow us