नाशिकमधील भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : जिल्ह्यातील वणी-सापुतारा (Vani-Saputara Road) मार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात (Accidents)तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यात दोन तरुणींसह एका युवकाचा समावेश आहे. यामुळं जिल्ह्यात शोककळा पसरलीय.
नाशिक वणी-सापुतारा या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. हा मार्ग गुजरातला जोडला असल्यानं रहदारी असते. या घटनेत वणीकडून सापुतारा येथे जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती आहे.
आजपासून बदलणाऱ्या नियमांमुळं थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या खाली उतरून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालाय. सायंकाळी साडे चार ते पाचच्या सुमारास अपघाताची घटना घडलीय. या घटनेत समवयस्क तरुण तरुणींचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौघे मित्र एका कारनं वणी सापुताराकडं निघाले होते. वणी ते सापुतारा रोडवर चौसाळे फाट्याच्यापुढं वणीकडून सापुताराकडं जाताना कार भरधाव वेगात असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. कार वेगात असल्यानं रस्त्याच्या खाली उतरल्यामुळं हा अपघात होऊन कार उलटली. या अपघातात अंजली राकेश सिंग, नोमान चौधरी, सृष्टी नरेश भगत या तिघांचा मृत्यू झालाय.
अपघातात अजय गौतम हा जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातातील मृत व्यक्तीवर वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिीस करताहेत.