नगरकरांनो लक्ष द्या… पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

नगरकरांनो लक्ष द्या… पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Water Supply Disconnect : अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन देखील मनपाच्या वतीने नागरिकांना केले आहे.

मनपाचे नागरिकांना आवाहन
आज शनिवार रोजी महावितरण कंपनीने मनपास पूर्वसूचना न देता परस्पर त्यांचे दुरूस्ती कामासाठी शहर पाणीपुरवठा योजनेवर सकाळी 10.00 ते 12.30 वाजेपर्यत अचानक शट डाउन घेतला. त्यामुळे मुळानगर, विळद येथून शहरासाठीचा होणारा पाणी उपसा बंद पडलेला होता.

वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुळा नगर व विळद येथून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता वसंत टेकडी येथे पाणी येण्यास सुरुवात झाली व वसंत टेकडी येथे दुपारी तीन वाजता पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू होणार आहे.

या ठिकाणच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
शटडाऊन घेतल्यांनंतर बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागाचे पाणी वाटप विस्कळीत झालेले असून या भागात उशिराने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.

रविवार दिवसाचे नियोजन
पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड) बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी इत्यादी भागास उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube