महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्येत वाढ होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश
Number of posts in Maharashtra Group-C Combined Preliminary Examination to increase CM Fadnavis issues directives
Number of posts in Maharashtra Group-C Combined Preliminary Examination to increase CM Fadnavis issues directives : महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. मात्र ही परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. या बदलामुळे सदर भरती प्रक्रिया आणखी काही महिने चालू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांमध्ये सध्या रिक्त असलेली तसेच आगामी काळात रिक्त होणारी पदे विचारात घेऊन महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तील पदसंख्या वाढवण्यात येणार आहे. याबाबत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोस्ट करत माहिती दिली. तसेच स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आगामी MPSC परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडतील, इतक्या मोठ्या संख्येने रिक्त पदे भरतीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सरकारकडून केली जात आहे. एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीऐवजी बहुपर्यायी पद्धतीने घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत समितीने सकारात्मक शिफारस केल्यास राज्य सरकार त्यावर अनुकूल निर्णय घेईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. मात्र ही परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. या बदलामुळे सदर भरती प्रक्रिया आणखी काही महिने चालू राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांमध्ये सध्या रिक्त असलेली तसेच… pic.twitter.com/02djZNYo3N
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) September 23, 2026
नेमकं काय म्हणाले अभिमन्यू पवार?
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. मात्र ही परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. या बदलामुळे सदर भरती प्रक्रिया आणखी काही महिने चालू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांमध्ये सध्या रिक्त असलेली तसेच आगामी काळात रिक्त होणारी पदे विचारात घेऊन महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सर्व विभागांची अतिरिक्त मागणीपत्रे लोकसेवा आयोगास पाठवावी अशी मागणी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. येत्या आठवड्यात साप्रविकडे पुढील पाठपुरावा करण्यात येईल.