Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर राम शिंदे म्हणाले…
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत काही होणार नाही, अशा पद्धतीनं भाजप नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं. पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीशी त्यांनी संवाद साधला.
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)हे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का? या प्रश्नावर आमदार राम शिंदे म्हणाले की, विखे पाटील हे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत. अजून तीन वर्ष होणं बाकी आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे महसूलमंत्री आहेत. अजून भारतीय जनता पार्टीशी (BJP)समरस व्हावं अनुरुप व्हावं आणि त्यानंतर कोणीही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहू शकतं.
Sanjay Raut : मोदी व शाह यांनी जावेद अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे
पंकजा मुंडे यांची भाजपनं कोणत्याही प्रकारची समजूत न काढल्याचं म्हटल्यावर राम शिंदे म्हणाले की, आपल्याला जसं वाटतं तसं भाजपमध्ये नाही. पंकजा मुंडे या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. आजदेखील पंकजा मुंडे मध्यप्रदेशच्या त्या प्रभारी आहेत. कोणतीही निवडणूक असल्यास त्या स्टार प्रचारक असतात. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. शेवटी निवडणूकीत, राजकारणात चढउतार असतात, एखादी निवडणूक हारल्यानं कोणताही नेता संपत नाही. त्यामुळं भाजपमध्ये प्रत्येकाचा आदर आणि कदर पक्षसंघटनाकडून केली जाते, त्यालाच भाजप म्हणतात.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडं गेल्यावर राम शिंदे म्हणाले की, दुःख वाटण्याचं कारण नाही, ज्या दिवशी त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरुन राम शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण व्हावं असं आमदार शिंदे म्हणाले. अलिकडेच उस्मानाबादचं धाराशीव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालं त्यामुळं साहजिकच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं चोंडी गाव हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्याबद्दल सर्वसमावेशक चर्चा सुरु आहे. त्यामुळं अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नावाला कोणाचा विरोध असणार नाही, असंही यावेळी आमदार राम शिंदे यांनी यावेळी सांगितलंय.