Operation Tiger अडचणीत, ठाकरेंच्या संसदीय बैठकीत खासदार येणार; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

Operation Tiger :  ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा राजकीय

Operation Tiger

Operation Tiger :  ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. या चर्चांदरम्यान आज दिल्लीत ठाकरे गटाच्या संसदीय दलाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिप देखील जारी करण्यात आला आहे.  त्यामुळे या बैठकीत कोणते खासदार उपस्थित राहणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असताना आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

या अपडेटनुसार, या बैठकीत खासदार संजय दिना पाटील हजर राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा ऑपरेशन टायगर अडचणीत असल्याचा दावा करण्यात येत आहे.  पक्षाची साथ सोडणाऱ्या खासदारांना कायदेशीर कोंडीत पकडण्यासाठी आणि पुढील कारवाईची दिशा ठरवण्यासाठी आज संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे.

तर आता या बैठकीला खासदार संजय दिना पाटील बैठकीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असल्याने ते या बैठकीत हजर राहणार नाही असं सांगितलं जात आहे.

‘ऑपरेशन टायगर’ संभ्रम कायम; 19 जून नाही आता ‘या’ दिवशी होणार विलिनीकरणाची घोषणा

4 खासदारांची पत्रावर सह्या

तर दुसरीकडे पक्षाची साथ सोडणाऱ्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केलेल्या पत्रात 6 पैकी चार खासदारांनीच सह्या केल्याचा दावा देखील सध्या राजकीय वर्तुळात करण्यात येत असल्याने ऑपरेशन टायगर बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

follow us