Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी […]
सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशीची राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यांनतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी […]
Maharashtra Budget : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यानंतर विधीमंडळात बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. दोन दिवसांपासून बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधारी पक्षाला हे आयतेच कोलित मिळाल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्यात आणि राऊतांवर […]
मुंबई : विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर […]
अहमदनगर : अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील भिंगार छावणी मंडळाच्या 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही नाना पटोलेंचे […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लेट्सअप मराठीनं खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्याशी विधानभवनात संवाद साधला त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, […]