- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिवसेना गहाण ठेवली.., रामदास कदमांनी थेट उध्दव ठाकरेंना डिवचलं
रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]
-
Praful Patel म्हणतात आमची गुप्त चर्चा… तर फडणवीस म्हणतात ‘बात निकली है तो दूर तक जायेगी’!
गोंदिया : तुमच्यातील अनेकांना आश्चर्य वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येथे कसे काय, पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणात इकडच्या तिकडच्या चर्चा होतच असतात. तशी देवेंद्र फडणवीस आणि आमची नेहमीच गुप्त चर्चा होत असते. फडणवीस जिथं येतात, तिथून घेऊन जातात. पण, मी ती चर्चा जर सार्वजनिक केली तर अनेकांना अडचणीचे ठरू […]
-
BJP Meeting : भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीची तयारी कशी ? कोण राहणार उपस्थित ?
नाशिक : नाशिकमध्ये (nashik) आजपासून भाजपच्या (bjp ) कार्यकारणीची बैठक मध्ये पार पडत आहे. सातपूरमध्ये (satpur ) भाजपच्या कार्यकारणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. आज आणि उद्या भाजपचे मोठे नेते जसे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नारायण राणे, पियुष गोयल (Piyush Goyal) यासह राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. तर […]
-
Ahmednagar च्या नामांतरावर अहिल्यादेवीचे वंशज यशवंतराव होळकर म्हणतात…
अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत […]
-
..तर लोकशाहीवरचा विश्वास उडणार, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य
अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]
-
Cow Hug Day : मिठी मारण्यासाठी गाय कुठून आणायची? Jitendra Awhad यांचा सवाल
मुंबई : फेब्रुवारी महिना म्हंटले की ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) म्हणजेच प्रेमाचा दिवस मात्र यंदा या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारला शाब्दिक टोले लगावले आहे. गाईला मिठी मारण्याची केंद्र सरकारची कल्पना आपल्याला फार आवडली. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या […]










