कळंबा कारागृहात फुटली राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येची सुपारी; तब्बल 22 मोबाईलवरुन फिरली सूत्र

कळंबा कारागृहात फुटली राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येची सुपारी; तब्बल 22 मोबाईलवरुन फिरली सूत्र

सांगली : येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता नालासाब मुल्ला याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या हत्येनंतर अवघ्या 8 दिवसांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन डोंगरे हा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं असून त्याने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून या हत्येची सूत्र फिरविली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी डोंगरेसह याप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य चौघांनाही ताब्यात घेतले आहे. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. (Police arrested mastermind behind NCP Worker Nalasab Mulla murder case Sangli)

आपल्याला जामीन न मिळण्यासाठी नालासाब प्रयत्न करत असल्याच्या संशयातूनच सचिन डोंगरे याने या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

येवगेनीची तलवार म्यान; पुतिन विरोधातील बंड ठरलं पेल्यातील वादळ

दरम्यान, ताब्यात घेतेल्या चौघांनीच गोळ्या झाडल्या होत्या, अशी माहिती सांगली पोलिसांनी दिली. सनी सुनील कुरणे (वय 23, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (वय 20, रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ) आणि स्वप्नील संतोष मलमे (वय 20, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी गुह्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे.

काय होते कारण?

10 एप्रिल 2019 रोजी सांगली शहरातील मध्यवस्तीतील महावीर कॉलनी परिसरात महेश नाईक याचा खून झाला होता. या प्रकरणात सचिन डोंगरेसह 11 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर जुलै 2019 या टोळीतील 11 जणांवर मोक्का लावण्यात आला होता. त्यावेळी चौकशीत डोंगरेने या प्रकरणात मुल्लाचेही नाव घेतले. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई झाली. हाच राग मुल्ला याच्या मानात कायम होता.

दरम्यानच्या काळात मुल्ला जामिनावर सुटला. मात्र, त्यानंतर तो डोंगरेचा जामीन होऊ नये, यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती डोंगरेला मिळाली. हा राग मनात  ठेवून डोंगरे याने स्वप्नील मलमे याला मुल्लाच्या हत्येची सुपारी दिली. त्यानुसार मलमे हा शनिवारी (17 जून) तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्नील मलमे आणि सनी कुरणे यांनी मुल्लावर आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपे याने तलवारीने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात मुल्लाचा मृत्यू झाला.

संभाजी राजे छत्रपती यांच्यासाठी कोणता मतदारसंघ सोपा? त्यांनी घेतले हे नाव….

त्यानंतर या प्रकणातील अल्पवयीन मुलगा वगळता अन्य चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी डोंगरे याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, सचिन डोंगरे याने कळंबा कारागृहातून जवळपास 22 मोबाईल कॉल करून खुनाची सूत्रे हलविल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. डोंगरे कारागृहातून मोबाईलवरून हल्लखोरांसह अन्य गुन्हेगारांशी संपर्कात होता. एकच क्रमांक विविध मोबाईलवरून वापरल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर कारागृहाती तपासणी करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube