संभाजी राजे छत्रपती यांच्यासाठी कोणता मतदारसंघ सोपा? त्यांनी घेतले हे नाव….
Sambhaji Raje Chhatrapati : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात लोकसभेसोबतच (Lok Sabha) राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे देखील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. समविचारी पक्ष स्वराज्य संघटनेसोबत (swarajya) युती करत असतील तर आमची दारं उघडी आहेत, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी घेतली. (Sambhaji Raje Chhatrapati said Swarajya organization is open for like-minded parties, also indicated to contest Lok Sabha from Nashik)
आज स्वराज्य संघटनेचा भव्य मेळावा नाशिकमध्ये झाला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सत्तेत आणि विरोधी पक्षात मजबूत लोक पाहिजेत. मजबुत विरोधक असले तरच लोकशाही टिकू शकते. लोकशाहीत मोकळ्यापणाने बोलायला पाहिजे, ते आज होत नाही. जनतेच्या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल दिली जाते, असं त्यांनी सांगितलं. स्वराज्य संघटना कोणासोबत जाणार? या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले, आम्ही समविचारी पक्षासोबत जाऊ, समविचारी पक्ष आमच्यासोबत युती करत असतील तर आमची दारं उघडी असल्याचं त्यांनी सांगितलं.
नाशिक हा सगळ्यात ताकदवान जिल्हा आहे. संभाजीराजे नाशिकमधून निवडणूक लढतील, अशी एक चर्चा जनमाणसात आहे. याविषयी विचारले असता संभाजीराजेंनी सांगितलं की, नाशिक आणि नांदेडमधून मी निवडणूक लढवण्याची मागणी जनतेमधून होत आहे. लोकांचा माझ्यावर किती विश्वास आहे, हे पाहायला पाहिजे, असं म्हणत नाशिक लोकसभा निवडण्याचे संकेत त्यांनी दिले.
Asian Games 2023 : बीसीसीआयचा यू टर्न, भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ चीनमध्ये खेळायला जाणार!
यावेळी त्यांनी भाजप-सेना युतीवर टीका केली. ते म्हणाले, सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं, तरी अजूनही गड किल्ल्यासंदर्भात कोणतेही कामे होत नाहीत. मी गडकोट किल्ल्यांसाठी भांडतोय. किल्ल्याच्या बाबत कोणताही मास्टर प्लॅन सरकारकडे नाही. गड किल्ल्यांच्या संवर्धानासाठी सरकारकडून काही केल्या जात नाही. त्यामुळे राज्य सरकारविषयी माझी नाराजी आहे. यावेळी संभाजीराजेंनी७५ वर्षाचा इतिहासच काढला. ३५० किल्ल्यांसाठी ७५ वर्षांत काय केलं हे सरकारने सांगावं? छत्रतपी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर किती खर्च केला? असा थेट सवाल त्यांनी केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, बीआरएस महाराष्ट्रात येतेय हे चांगलं आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी ज्या प्रकारे चंद्रेशेखर राव यांचं सरकार काम करते, ते कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.