Adhik Maas 2023 : ‘या’ कारणामुळे अधिक महिन्यात विठूरायाची पाद्यपूजा राहणार बंद
Adhik Maas 2023 Pandharpur : यावर्षी श्रावण महिन्याच्या ठिकाणी अधिक महिना आला आहे. याला मल मास, पुरूषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हटलं जात. त्याचबरोबर या महिन्यात लोक जावयाला नारायण मानून त्याला अनारशांचं वाण देतात. तसेच भाविक या महिन्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तीर्थस्थळांना भेटी देतात. त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूराची पाद्यपुजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Pandahrpur Vitthal Mahapooja will Stop in Adhik Mahina )
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ज्या खेळाडूला रोहितने बाहेर बसवलं तोच ठरला वेस्ट इंडिजमध्ये हिरो
का बंद राहणार विठूरायाची पाद्यपूजा?
अधिक महिन्यात विठूरायाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र अगोदरच मोठी गर्दी लोटणाऱ्या या तीर्थस्थळावर आणखी गर्दी झाल्याने भाविकांनी दर्शन घेण्यात उशीर लागू शकतो. त्यामुळे भविकांकडून करण्यात येणारी विठ्ठलाची पाद्यपूजा बंद राहणार आहे. कारण यामुळे इतर भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मात्र जास्तीत जास्त लोकांना वेळेत विठ्ठलाचं दर्शन घेता यावं. यासाठी अधिक महिन्यात विठूरायाची पाद्यपूजा बंद राहणार आहे. त्याचबरोबर तुळशी अर्चन पूजा देखील बंद ठेवण्यात यावी अशी मागणी भाविक मंदीर समितीकडे करत आहेत.
अजितदादा मुख्यमंत्री होणार का? उत्तर देताना बच्चू कडूंचंही तळ्यात-मळ्यात
काय आहे आधिक माहिना?
हिंदू परंपरेप्रमाणे दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. यावर्षी आधिक महिना 18 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत असणार आहे. अधिक महिना हा हिंदू पंचांगामध्ये असणाऱ्या दररोज घटलेल्या तिथींमुळे तब्बल एक महिना तयार होईल एवढ्या तिथींमध्ये घट पकडली जाते. त्या तिथींच्या एकत्रिकरणातून एक महिना वाढतो. जो दर तीन वर्षांनी येतो. या महिन्यात लोक जावयाला नारायण मानून त्याला 33 अनारशांचं वाण देतात. हा महिना 33 दिवसांचा असतो म्हणून त्यात 33 या संख्येचं जास्त महत्त्व असतं.